Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत सांगवी येथे प्रारंभ!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण् राज्यभर येत्या १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली असून कोरोना नियंत्रणासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देणार आहेत.

Google Ad

यामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेवून त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा प्रारंभ ‘आमदार लक्ष्मण जगताप’ पिंपरीचिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत सांगवी येथून आज शुक्रवारी ( ता.१८ ) रोजी करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून, या सर्वेतून एकही कुटूंब अथवा घर चुकू नये. याकामी सर्वांचे सहकार्य घ्या. मात्र घरोघरी सर्वेक्षण करण्याकरिता नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना, स्वयंसेवकाना नागरिकांनी सहकार्य करावे असे यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या.

सांगवी येथे अहिल्यादेवी पुतळ्याशेजारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी ‘आमदार लक्ष्मण जगताप’, महापौर माई ढोरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी विजया आंबेडकर , सहायक आयुक्त खोत, नगरसेवक संतोष कांबळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, कार्यकारी अभियंता अनिल राऊत तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!