Google Ad
Editor Choice Maharashtra

‘चला एक जीव वाचवूया, प्लाझ्मा दान करू या! कोरोनामुक्त नागरिकांसाठी ‘प्लाजमादान संकल्प अभियान’ … ‘शिवराज लांडगे’ यांचे भावनिक आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘चला एक जीव वाचवूया’ … ‘प्लाझ्मा दान करूया’ … प्लाजमा दानाची लॉगिन अधिक व्यापक करण्यासाठी व त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्लाझ्मा दान संकल्प शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

प्लाझ्मादान करण्याबाबत अध्यापही लोकांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्लाझ्मादान करण्याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही लोकांचे गैरसमज दूर करून त्यांना प्लाझ्मादान करणेबाबत प्रोत्साहित करण्याकरीता शिबिर आयोजित करत आहोत, असे ‘शिवराज सुदामराव लांडगे’ यांनी सांगितले.

Google Ad

प्लाझ्मा दान करण्यासाठी नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यात पुढे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिवराज लांडगे यांनी केले आहे. 9822552273, 9822217163, +919325505505. करोना मुक्त होऊन ज्यांनी २८ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेला आहे, अशा सर्व नागरिकांनी आपली नोंदणी करून घ्यावी व कोरोनाशी लढणाऱ्या आपल्या मायबाप, बंधू-भगिनींना जीवनदान देण्याची विनंती यावेळी शिवराज लांडगे यांनी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

83 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!