Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी किरण जोशी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जुलै) : ज्येष्ठ पत्रकार किरण जोशी यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी एक मताने निवड पत्रकार संघाच्या सिद्धार्थ हाॅल कर्वे नगर पुणे येथे करण्यात आली. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रमुख मार्गदर्शक आणि संघटक संजय भोकरे, वृत्त वाहिनी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे, ज्येष्ठ पत्रकार संजीव शाळगावकर, चिटणीस सुरेखा खानोरे,जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे,सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप भटेवरा व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व रंग भुमीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, इत्यादी मान्यवर व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष तथा राज्य कार्यकारणी सभासद उपस्थित होते.

पूर्वीचे राज्य अध्यक्ष वसंत मुंढे यांचा कार्यकाल पुर्ण झाला होता.त्या अनुषंगाने नविन अध्यक्ष कोण होणार?याची उत्सुकता लागली होती.अनेक जण रिंगणात होते.पण केंद्रीय निवड समितीने सर्व पर्याय तपासून ज्येष्ठ पत्रकार किरण जोशी हे नाव पुढे आणले आणि त्यांच्या नावाला एकमत झाले. श्री. जोशी मूळचे सांगलीचे परंतु त्यांचे संपुर्ण शिक्षण हे पुणे विद्यापीठ मध्ये झाले असल्याने आणि कामानिमित्त त्यांनी पुण्यातच पुढारी, लोकमत,सकाळ या सारख्या दैनिकात सेवा केली. सडेतोड लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य. राज्य अध्यक्ष एवढी मोठी जबाबदारी त्यांचेवर आली असताना राज्य अध्यक्ष किरण जोशी म्हणाले की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा भारतातील सर्वात मोठा पत्रकार संघ असून प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार संघाचे कार्यालय आहे.

Google Ad

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साडेसहा हजाराहून अधिक पत्रकार या पत्रकार संघाशी निगडित आहेत.पत्रकारांचे हित डोळ्यापुढे धरूनच पुढील वाटचाल सुरू राहील.कोणत्याही पत्रकाराला अडीअडचण आली तर अध्यक्ष या नात्याने मी 24 तास उपलब्ध राहील असे जोशी म्हणाले.नव्याने अध्यक्ष झालेले किरण जोशी यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे, त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!