Google Ad
Editor Choice

राज्यात दहीहांडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जुलै) : मागील दोन वर्षांपासून करोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता करोना संसर्ग कमी झाल्यामुळे यावेळी सर्व सण जल्लोषात साजरे केले जाणार आहेत.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने येत्या 19 ऑगस्टला दहीहंडीची सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहर व उपनगर जिह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये गोपाळकाला या सणाच्या दिवशी बंद राहातील.

Google Ad

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच यंदाच्या वर्षीची सुट्टी जाहीर केली आहे. असे आज ‘सामना’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना देण्यात येणार असून राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यंदा कोणत्याही सणाला कुठले ही निर्बंध नसल्याने सर्व सण उत्साहात आणि दणक्यात जल्लोषात आनंदानं साजरा करावे तसेच दही हंडीच्या उत्सवासाठी थरांच्या बाबत सर्व गोविदांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून रचाव्यात असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहांडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. आणि तसे निवेदन देखील पाठविले होते. आमदारांच्या मागणीला तातडीनं प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!