Google Ad
Editor Choice Education

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये ‘आयटूई’ स्पर्धा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० डिसेंबर) : चिंचवड येथील यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर  फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन  अँड  एन्टरप्राईज  यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील  उद्योजकीय  वृत्ती जागृत करण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन टू एंटरप्राइज’ (आयटूई) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कल्पना सादर  केल्या. आयआयएमएस चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी  आपल्या स्वागतपर भाषणात या  स्पर्धेत  सहभागी  झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.   

स्पर्धेच्या पहिल्या गटात  पल्लवी  देवरे व सरिता साळुंके या विद्यार्थिनींनी ‘हायड्रो युग’ ही  अभिनव संकल्पना  सादर केली. मातीचा कमीत कमी वापर करीत व पाण्याचा वापर करून हायड्रोपोलिक तंत्रज्ञानाचा वापर करीत  घरातल्या घरात किंवा अतिशय छोट्या जागेत भाजी पाला पिकवून उत्तम व्यवसाय तयार होऊ  शकतो असे या संकल्पनेत मांडण्यात आले.

Google Ad

तर दुसऱ्या  गटातील  विद्यार्थी हरिदास खारखडे याने वाढत्या  नागरीकरणामुळे  परवडणारी घरे उपलब्ध  करून देण्यासाठी सिमेंट पाइपचा वापर करून अल्प उत्पनामध्ये घरे उपलब्ध करून देणारी संकल्पना मांडली.

 तर स्पर्धेच्या  तिसऱ्या  गटात श्रुती कोडक  हिने प्लास्टिक पिशव्यांचे रूपांतर फॅब्रिक हँडलूममध्ये करून आकर्षक पिशव्या  तयार करण्याची व्यवसाय संकल्पना  मांडली. डॉ. वंदना  मोहांती व डॉ.सचिन मिसाळ यांनी परीक्षक म्हणून  तर प्रा. स्वाती भालेराव  यांनी  या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून  काम पाहिले.

अधिक  माहितीसाठी संपर्क 

योगेश रांगणेकर 

मो  : 7350014536 / 9325509870

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!