Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी -पिंपळे गुरव मनसे शाखा अध्यक्षांचा थेट ‘अजित पवार’ यांना इशारा … पहा, काय म्हणाले…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० डिसेंबर) : अजितदादा पवार उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पिंपरी चिंचवड मनसेच्या पदाधिकाऱ्याने खडे बोल सुनावले आहेत, आपण नवीन भरतीची धमकी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना देत आहात का? असा सवाल त्यांनी केला आहे.

नवी सांगवी-पिंपळे गुरव मनसेचे शाखा अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची समस्या ही धमकी देऊन नाही तर चर्चेतून सुटू शकते. परिवहन कर्मचारी गेल्या पन्नास वर्षापासून त्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत, पंरतु कोणत्याही सरकारने त्यांच्या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहिले नाही, साधा भंगार विक्रेतासुध्दा आपल्या मुलांना चांगले शिक्षण देतो, त्यांच्या आजारपणात त्याच्या खिशात पैसे तयार असतात, आपण मात्र वर्षानुवर्षे आहे तेथेच आहे, साधा चहा पिण्याची ताकद नाही, अशी भावना ह्या कर्मचाऱ्यांची झाली, जर आपली आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे, परिवहन मंडळाची राज्य सरकारमध्ये विलीनीकरण. त्यामुळे आज तुम्ही त्यांचे सर्व मागणी मान्य करीत आहात, पण कर्मचारी ऐकायला तयार नाही.

Google Ad

तो विलीनीकरण करण्यावर ठाम आहे, आता प्रश्न सुटत नाही हे पाहून तुम्ही त्याला नव्याने भरती सुरु करण्याची धमकी देता आहात. अनिल परब यांच्या मेसमा कायदा, आणि आता तुमची धमकी, याला हा कर्मचारी भिक घालेल असे वाटत नाही, उलट ह्या धमकीमुळे नवीनच संघर्ष उभा राहील, ह्या संघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, परिवहन महामंडळाच्या बाजूने भक्कमपणे उभी राहील, हा आमचासुध्दा आपणाला इशारा आहे. असा गंभीर इशारा दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!