Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार … उद्या, होणार स्पष्ट!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी शुक्रवार (दि.०५, मार्च ) रोजी ही निवडणुक होणार असून उद्या मंगळवार (दि.०२मार्च ) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. त्यामुळे चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

सभापती पदासाठी भाजपाचे शत्रुघ्न उर्फ बापू काटे, रवी लांडगे आणि नितीन लांडगे यांच्यात चूरस आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (दि.०२) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. ०५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

Google Ad

महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे रवी लांडगे, नितीन लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, राजू बनसोडे, सुलक्षणा धर, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!