Google Ad
Editor Choice india

Delhi : गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे … पंतप्रधान नरेंद्र मोदी 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ मे) : आपल्यातील काही घटक हे समाजात तिरस्कार परसरवत आहेत. हे मानवतेसाठी धोकादायक आहे. गौतम बुद्धांचे आयुष्य हे एखाद्या दीपस्तभासारखं आहे. मानवतेवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यावं आणि बुद्धांच्या शिकवणीच्या आधारे मानवजातीसाठी काम करुन ते सुंदर करावं. जगभर तिरस्कार पसरत असताना गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे असं बौद्ध पोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आज वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध भिक्खुंशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या सांस्कृतीक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या वतीनं संयुक्तपणे करण्यात आलं होतं.

Google Ad

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जगासमोर हवामान बदलाचं संकट आवासून उभं आहे, धृवांवरील बर्फ वितळत आहे. जग एका मोठ्या संकटातून जात आहे. अशा वेळी गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग महत्वाचा आहे. निसर्गाचा आदर करणे, पृथ्वीचे संवर्धन करणे ही गौतम बुद्धांची शिकवण आहे. जगभरातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी असलेला भारतही शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे याचा अभिमान आहे.”

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!