Google Ad
Editor Choice india

Delhi : पोस्ट खात्यातील ४२६९ पदांसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ … इथे करा अर्ज

महाराष्ट्र 14 न्यूज : भारतीय पोस्ट खात्याने ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. नव्या नोटिफिकेशन्सनुसार गुजरात आणि कर्नाटक पोस्ट सर्कलमधील 4269 पदांसाठी उमेदवारांना आता 23 जानेवरीपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी 20 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोस्ट खात्यातील या पदासाठी 10 वी पर्यंत शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. भारयीत डाक विभागाच्याhttp://appost.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खुल्या आणि ओबीसी वर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तर एससी आणि एसटी वर्गातील महिला उमेदवारांना नि:शुल्क अर्ज करता येणार आहे.

Google Ad

🔴या राज्यांमध्ये भरती

ग्रामीण डाक सेवक पदासाठी केवळ कर्नाटक आणि गुजरात सर्कलमध्ये भरती होणार आहे. कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये 2443 आणि गुजरात सर्कलमध्ये 1826 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवण्यात आल्याने आता उमेदवारांना तीन दिवसांची अवधी मिळाला आहे.

🔴अशी होणार निवड

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. ऑनलाईन जमा अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाईल. ही निवड करताना केवळ इयत्ता 10वीच्या गुणांचाच विचार केला जाणार आहे. उच्च शिक्षण असलेल्यांना या भरतीचा कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नाही. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावं, असं डाक विभागाने स्पष्ट केलं आहे. तसेच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन्स वाचूनच अर्ज करावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!