Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आयुक्तांनी दिले सुधारित आदेश … काय आहेत, वाचा सविस्तर!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम २०२० अंमलात आलेले आहेत , कोविड -१९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी राजेश पाटील , आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी चिंचवड संपुर्ण कार्यक्षेत्रासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना व उपाययोजना निर्गमित केल्या आहे .

१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था , प्राथमिक व माध्यमिक शाळा , महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच खाजगी शिकवणी वर्ग ( Coaching Classes ) दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील . मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील . इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षा असल्यामुळे त्यांना या मधून वगळण्यात येत आहे .

Google Ad

२. सर्व कोचिंग क्लासेस ( MPSC / UPSC वगळून ) दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद राहतील . MPSC , UPSC चे कोचिंग क्लासेस आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेनुसार त्याकरीता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना / अटींच्या आधीन राहून सुरु राहतील .

३. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण / सेवा वगळता दि . १२ मार्च २०२१ पासून रात्री ११:०० ते सकाळी ०६:०० यावेळेत संचार करणेस प्रतिबंध असेल , मात्र यामधून जीवनावश्यक वस्तूंचा ( दुध , भाजीपाला , फळे इ . ) पुरवठा करणारे , वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना / व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे . तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबधित आस्थापनेवरील कर्मचा – यांना व त्यांची ने – आण करणा – या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात येत आहे .

४. पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल / बार रेस्टॉरंट / उपहारगृहे रात्री १०:०० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील व पार्सल सेवा रात्री ११:०० वाजेपर्यंत सुरु राहतील . तसेच हॉटलाबाररिस्टॉरंट / उपहारगृहे यांनी ५० टक्के आसन क्षमता वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे व त्याबाबतचा फलक हटिल / बार / रेस्टॉरंट / उपहारगृहे इत्यादी ठिकाणी दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहिल .

५. सर्व प्रकारचे मॉल , सिनेमागृह , दुकाने ( अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळून उदा . मेडिकल ) रात्री १०:०० बाजेपर्यंत सुरु राहतील .

६. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ( Outside Containment Zone ) लन समारंभ व इतर सामाजिक , राजकीय , धार्मिक कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील . तथापी , खुले मंगल कार्यालये / लॉन्स / मैदाने या ठिकाणी १०० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमास परवानगी राहील . सदर नियमांचा भंग झाल्यास जागा मालकाविरुध्द कारवाई करण्यात येऊन कार्यालय / सभागृह सील करण्यात येईल . अत्यंसस्कार , दशक्रिया विधी , दफन विधी व त्याच्याशी निगडी कार्यक्रम यांना देखील हा नियम लागू राहील .

७. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने ( Garden ) दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील .

८. रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल ( टप – या ) व इतर ठिकाणी एकाच वेळी पाच लोकांची उपस्थिती अनुज्ञेय राहील . पाच पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल .

१. सोसायटीच्या आवारातील सोसायटीचे क्लब हाऊस दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद राहतील . १०. गृह अलगीकरणामध्ये ( Home Isolation ) असलेल्या रुग्णांनी गृह अलगीकरणाच्या नियमांचा भंग करुन ते घराबाहेर फिरल्यास त्यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल . सदरचा रुग्ण सोसायटीमधील रहिवासी असल्यास त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधीत सोसायटी चेअरमन यांची राहील . जर रुग्णांने गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संपुर्ण सोसायटी सील करण्यात येईल .

११. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार व व्यवसायिक तसेच भाजी मंडई , गाळे धारक यांचेवर नियंत्रण ठेवणेकरीता क्षेत्रिय अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी कारवाई करणे आवश्यक आहे . त्याअनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय देणेत येत आहेत . – संबधीत दुकानांची गल्ली व पार्किंगची जागा कमी असल्यास किंवा रस्ता लहान असल्यास पी १ पी २ किंवा सम विषम प्रमाणात दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा . दुकान गल्ल्यामध्ये पाकींगची व्यवस्था व रोडची रुंदी जास्त असल्यास सदरची दुकाने एका आड एक बंद ठेवण्याबाबत क्षेत्रिय अधिकारी यांनी पोलिस अधिकारी यांच्या मदतीने निर्णय > दुकानदार यांनी दुकानांसमोर सोशल डिस्टंसींग करीता ग्राहकांसाठी उभे राहणे याकरीता माकींग करावे . – भाजी मार्केटमधील भाजी दुकाने / गाळे हे एका आड एक सुरु राहतील याबाबत कार्यवाही करणे .

 

> वरील प्रकारची कारवाई करताना दुकानदार व व्यवसायिक तसेच भाजी मंडई धारक यांनी सहकार्य न केल्यास भारतीय दंड संहितेचे कलम १८८ खाली गुन्हे नोंदविण्यात यावेत .

१२.संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील .

१३. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील .

सदर आदेश दि .१२.०३.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील . सदरचा आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दि . १२. ०३ .२०२१ रोजी दिलेला आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!