Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पिंपरी-चिंचवडमध्ये डेटींग ॲपवर बोगस प्रोफाईल तयार करुन लाखो रुपयांचा गंडा … आरोपी तरुणीला गुन्हे शाखा ४ कडून अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : बंबल डेटिंग ऍप वर स्वतःचे नकली प्रोफाइल तयार करून पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल १६ जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

सध्याच्या धावपळीच्या जगात ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक फ्रॉड होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एका डेटींग ॲपवर बोगस प्रोफाईल तयार करुन लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे. सायली देवेंद्र काळे असे या मुलीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेन्नईहुन वाकडमध्ये आलेल्या एका व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने आणि पैसे लुटल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याच पद्धतीने देहूरोड मध्ये ही १ लाख ८५ हजार रुपयांचा सोने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती. दोन्ही घटना सारख्या वाटल्याने पोलिसांनी बंबल डेटिंग ऍप वर खोटी प्रोफाइल बनवत तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या.

Google Ad

अखेर तिच्याच जाळ्यात तीला अडकवत पोलिसांनी तीला अटक केली. पोलिस तपासात तीने तब्बल १६ जणांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी केवळ ४ गुन्हे दाखल आहेत. ज्यांना या महिलेने गंडा घातल्या त्यांनी तक्रार द्यायला पुढे यावे असं आवाहन पोलिसांनी केले आहे. या गुन्ह्यात महिलेने लुटलेले सोने हे सोन्याच्या दुकानात गहाण ठेवून ती तरुणी पैसे घेत होती. ज्या मोबाईलमध्ये हे बंबल आणि टींडर ॲप डाऊनलोड करून फसवणूक करत. यानंतर त्या मोबाईलमधून ते बंबल ॲप डिलीट करून मोबाईल फोडून टाकत असे. ही कल्पना एक वेबसिरीज पाहून तीला सुचल्याचे पोलिसांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

178 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!