Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad Pune

खुशखबर : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. त्यामुळे तब्बल ५ महिन्यांनंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे. २२ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन आणि पीएमपीएलच्या या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना दळणवळणात मोठी मदत होणार आहे.

विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी याला तत्वतः मान्यताही दिली. त्यामुळे आता २२ ऑगस्टला पीएमपीएल बससेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमपीएल प्रशासनाने पुढील आठवड्यात बसेस सुरु होतील असं सांगितलं आहे. मात्र, निश्चित तारिख सांगितलेली नाही. तरीही गणेश चतुर्थीच्या दिवशी बसेसचा श्री गणेशा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Google Ad

बस सेवा ठप्प असल्याने पीएमपीएलला मोठा प्रमाणा आर्थिक फटका बसलाय. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासह देखभाल दुरुस्तीचा खर्चही आवाक्याबाहेर जात आहे. यासंदर्भात सोमवारी पुणे आणि मंगळवारी चिंचवड मनपा आयुक्त आणि पीएमपीएल प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या निर्णानुसार पहिल्या टप्प्यात साधारण ४०० ते ४५० बसेस शहरात सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर बस सेवा सुरु होतील.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!