Google Ad
Editor Choice Politics Pune District

अजित पवार बारामती दौऱ्यावर … शरद पवार पुण्याकडे रवाना …तर इमॅच्युर कुणीकडे?

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सपत्नीक पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या कन्या- खासदार सुप्रिया सुळेही सोबत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाची बारामतीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबईतील सिल्व्हर ओकमधील निवासस्थानाहून पुण्याला रवाना झाले. दुपारच्या सुमारास ते मोदी बागेतील निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर पवार दाम्पत्य बारामतीला जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या पुणे भेटीचा तपशील गुलदस्त्यात असल्याने नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Google Ad

शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर कुटुंबात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांची भूमिका काय आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी पार्थविषयी बोलण्यास नकार दिला. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं बोलून ते निघून गेले.

अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकासकामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!