Google Ad
Editor Choice

‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’, व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अण्णा हजारेंना चिमटा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२सप्टेंबर) : देशात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यातच आता LPG गॅसचे दर 25 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका सुरु केलीय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनाही चिमटा काढलाय. पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न शेजारी बसलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचे व्यंगचित्र काढत क्लाईड क्रास्टो यांनी अण्णा हजारेंना फटकारलंय.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही, असा आरोप क्रास्टो यांनी केलाय. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून चांगलं काम करणाऱ्या राज्य सरकारच्याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून अण्णा हजारे यांना वाढत्या पेट्रोल – डिझेल व गॅसच्या दरवाढीवर जोरदार चिमटा काढलाय.

Google Ad

हे व्यंगचित्र अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे. तर चक्क गॅस सिलेंडरच ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न करत आहे. क्लाईड क्रास्टो यांच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या व्यंगचित्रातून आतातरी अण्णा हजारे बोध घेतील का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

45 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!