Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी नदी काठच्या परिसरातील अवैधरित्या ब्लु- लाईन मध्ये करत असलेल्या भंगाराचा व्यापार हटविणेबाबत शिवसनेचे आयुक्तांना निवेदन!

 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी व पिंपळे गुरव नदी काठच्या परिसरातील अवैद्यरित्या ब्लु-लाईन मध्ये करत असलेल्या भंगाराचा व्यापार हटविणेबाबत शिवसेना महिला आघाडीच्या सुषमा शेलार यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

Google Ad

या निवेदनात शिवसेना महिला आघाडीच्या सुषमा शेलार यांनी म्हटले आहे की, पिंपरी मतदारसंघातील दापोडी व पिंपळे गुरव नदी काठच्या परिसरात अवैधरित्या ब्लु- लाईन मध्ये काही भंगार व्यापा – यांनी आपला भंगार व्यवसाय सुरू केला आहे . सदर भंगारवाल्यांना ज्या वस्तू उपयोगी नसतात त्या वस्तू ते नदी पात्रात टाकून नदीचे पाणी दुषीत करत आहे . सदर भंगारवाले जी वस्तू नदी पात्रात टाकत आहेत त्या वस्तूचा नदीत कचरा जमा झाल्याने डासांच्या प्रमाणात खुप वाढ झालेली आहे . त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे, आणि पर्यावरणास हानी पोहचविण्याचे काम हे भंगारवाले सदर भंगार व्यवसायातून करत असल्याची तक्रार दापोडीतील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मिळून केली आहे .

तरी बेकायदेशीर अतिरिक्त रित्या ब्लु-लाईन नदी काठावर चालू असलेला भंगार व्यवसाय तातडीने हलवून सदर जागा मोकळी करावी अशी विनंती करणारे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचेही निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले आहे, आता आयुक्त काय भूमिका घेतात, हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!