Google Ad
Editor Choice

दापोडीतील सुंदरबाग येथील अग्रसेन भवन समोरील रेल्वेभिंतीलगतचा भाग झाला कचरा आणि दुर्गंधी मुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जानेवारी) : पिंपरी चिंचवड शहराचा स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये नंबर यावा, याकरिता महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात नागरिकांचे समुपदेशन करणे चालू आहे. कारण शहर स्वच्छ ठेवण्याकरिता नागरिकांचा सहभाग फार महत्वाचा आहे.

हे ओळखून आपल्या भागाचाही कायापालट व्हावा, यादृष्टीने सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया काटे या नेहमीच अग्रभागी असतात, दापोडीतील सुंदरबाग येथील अग्रसेन भवन समोरील रेल्वेभिंतीलगत कचर्याचे प्रमाण वाढले होते, कचराकुंडी नसुनही तेथे मोठ्या प्रमाणात रोजच कचरा जमा होत होता तसेच दुर्गंधीही पसरली होती व त्याचा त्रास स्थानिक नागरिक , रेल्वेप्रवासी तसेच येणार्या जाणार्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत होता.

Google Ad

याची तक्रार तेथील नागरिकांनी सुप्रिया काटे यांच्याकडे केली असता त्याची त्वरित दखल घेत, नगरसेवक रोहित अप्पा काटे यांच्या मार्गदर्शनात आरोग्यअधिकारी यांच्याशी संपर्क साधुन तेथील कचरा त्वरीत हटविण्यास सांगितला व तो परिसर स्वत: थांबुन स्वच्छ करुन घेतला. त्यामुळे परिसरात आता स्वच्छता दिसून येत आहे, व नागरिकांना होणारा दुर्गंधीचा त्रासही कमी झाला.


 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!