Google Ad
Editor Choice

पत्नीला गाडी शिकवायला गेले, अन अंगलट आले… नशीब बलवत्तर म्हणून, पण नवी कोऱ्या चारचाकीचा चक्काचुर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जानेवारी) : रक्षक चौकाकडून पिंपळे निलखच्या दिशेने शिकाऊ महिला नवीन कोरी चार चाकी वाहन चालवीत असताना अचानक ब्रेकवर पाय देण्याऐवजी एक्सिलेटरवर पाय दिल्याने दुतर्फा बाजूकडील पदपथाला लागून असणाऱ्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकली. यावेळी मागून येणारा दुचाकी वाहन चालकही चारचाकी वाहनाच्या उजव्या बाजूला धडकून पदपथावर पडला.

याप्रसंगी दुचाकी वाहन चालकाच्या गुडघ्याला, हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दुचाकी वाहन चालकास औंध उरो रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. ही घटना सोमवार (दि. १०) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रसंगी नवीन कोरी असलेली एम एच १४ जे यू ८९५८ हे चार चाकी वाहन चालवीत असताना पुढे पती, पत्नी तर मागे मेहुणा, मेहुणी बसले होते. सर्व रा. रिजन्सी पॅराडाईज, भारत गॅस एजन्सीजवळ रहाटणी. यावेळी पती गिरगावकर वय (३६) हे पत्नी माधवी गिरगावकर (वय ३०) हिला वाहन चालविण्यास शिकवत होते.

Google Ad

यावेळी रक्षक चौकाकडून पिंपळे निलख गावठाणच्या दिशेने जात असताना पुढून दुचाकी वाहन येत असल्यामुळे पती अभिजित यांनी ब्रेक दाबण्यास सांगितले असता पत्नी माधवीने एक्सिलेटर दाबला. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून दुतर्फा बाजूस पदपथाला लागून असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर चारचाकी वाहन जाऊन धडकले. वाहन सुरक्षा भिंतीला इतकी जोरात धडकली की दहा फूट लांब असलेली भिंत कोसळून पडली.

नशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात चारचाकी वाहनातील सर्वांचा जीव वाचला. कोनालाही इजा झाली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. नुकतेच ५ जानेवारीला शोरूम मधून ‘आय -20’ हे चार चाकी वाहन खरेदी करून आणले होते. या अपघातात चारचाकी वाहनाच्या पुढील बाजूकडील भाग चक्काचूर झाला होता. मात्र मागून येणाऱ्या दुचाकी स्वार प्रथमेश व्यास (वय २२) रा. आपटे रोड डेक्कन याची एम एच १२ के जी ८१९ होंडा ऍक्टिवा कारला धडक होऊन गंभीर रित्या जखमी झाल्याचे समजते. दुचाकी वाहनाचे थोड्या प्रमाणात नुकसान झाल्याचे घटनास्थळी दिसून आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!