Google Ad
Editor Choice

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या आर्थिक दुर्बल व्यक्तींचं होणार मोफत लसीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५मे) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळेपुणे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला दर 2 दिवसांनी ब्रेक लागतोय. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण सुरू झाले आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये 600 ते 1 हजार 200 रुपये दर आकारुन लस दिली जात आहे. मात्र आर्थिक दुर्बल घटकांना ते परवडणारे नाही.

त्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आर्थिक दुर्बल व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतलीय. खासगी रुग्णालयांना 630 रुपयांत लसीचा एक डोस केंद्र सरकारकडून उपलब्ध होत आहे. त्यात अधिक आकारणी करून साधारण 900 रुपयांपर्यंत एक डोस घेता येणार आहे.

Google Ad

मात्र 900 रुपये प्रति डोस किंमत देण्याइतकी आर्थिक स्थिती नसलेल्या रिक्षाचालक, घरकाम करणारे कर्मचारी, फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेत्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोफत लस दिली जाणार आहे. यासाठी कोणतीही कागदपत्र देण्याची गरज नाही. 45 वर्षांपुढील व्यक्तीला नोंदणी न करता आणि 18 ते 44 वर्षांच्या व्यक्तीला कोवीन अॅपवर नोंदणी करून मोफत लस मिळणार आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सुरु केलेल्या मोहिमेचं गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांनी कौतुक केलं आहे. अशाप्रकारे मोफत कोरोना लस देणारे मंगेशकर रुग्णालय हे राज्यातील पहिलं रुग्णालय ठरलं आहे. या रुग्णालयात दिवसाला 100 ते 200 डोस मोफत दिले जाणार आहेत. इतरांना लस देऊन मिळणाऱ्या पैशातच या लसींची खरेदी होणार आहे. मंगेशकर रुग्णालयाला या उपक्रमातून एक रुपयाही मिळणार नाही. सरकारी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या लसींचा तुटवडा लक्षात घेता अनेक नागरिक खासगी रुग्णालयात लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र इच्छा असूनही परिस्थिती अभावी ज्यांना लस घेता येत नाही अशांसाठी रुग्णालयाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!