Google Ad
Editor Choice Education

 टीईटी पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत 6 जणांना अटक 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ डिसेंबर( : टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आल्यावर आता आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही अटक करण्यात आली आहे.

Google Ad

टीईटीच्या परिक्षेतील गैरप्रकार हे जेव्हापासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजे, 2017 पासुन सुरु होते, असं आता स्पष्ट झालंय. याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी आणखी दोन महत्वाच्या व्यक्तींना या प्रकरणात अटक केली आहे. यातील पहिली अटक आहे, जीए टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याची. अश्विन कुमारला पुणे पोलीसांनी बंगळुरूमधून अटक केली आहे.

तर दुसरी महत्त्वाची अटक आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांची. डेरेंना संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून पोलिसांनी अटक केली आहे. अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रितेश देशमुखचा वरिष्ठ आहे. तर सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याच समोर आलं आहे. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे 2017 ते 2020 या काळात शिक्षण परिषदेचं परीक्षा घेण्याचं कंत्राट होतं. मधल्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!