Google Ad
Editor Choice

गांधीनगरातील गरजू कृटुंबांना अन्नसुरक्षा : आमदार बनसोडे यांचा पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ६ ऑक्टोबर) :  सोमवार दि. ४ ऑक्टोबर  रोजी परिमंडळ कार्यालय ज विभाग पिंपरी ,संत तुकाराम व्यापार  संकुल निगडी येथे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती ची  बैठक नुकतीच संपन्न झाली .

बैठकीत काही विशेष मुद्यावर चर्चा झाली , अध्यक्ष या नात्याने आमदार अण्णा बनसोडे यांनी रेशनिंग संदर्भातल्या अडचणी तातडीने सोडवण्याचे तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ च्या अनव्ये ५९००० रुपये उत्पन्नाच्या दाखल्याची अट न ठेवता स्वघोषणा  पत्र स्वीकारून लाभार्थ्यांना तातडीने शिधापत्रक वितरित करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकारी व  दक्षता समिती मधील सदस्यांना दिल्या होत्या.त्या दरम्यान गांधीनगर मधील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भांडेकर यांनी गोरगरीब वडार समाजातील जवळपास ३०० शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनांतर्गत लाभ द्यावा अशी विनंती आमदार बनसोडे यांना केली होती त्याची तातडीने दखल घेत आज लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली.

Google Ad

 त्यासोबतच समिती वरील सदस्य व रास्त भाव दुकानदार यांच्यात ओळख होणे महत्वाचे आहे याबाबत एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी, सर्व सदस्यांना त्वरित ओळखपत्र देण्यात यावे ,शिधा पत्रिका एजेन्ट कार्यालयीन कामकाजात अधिकारी व कर्मचारी यांच्यात वादविवाद करून सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवितात याला आळा  बसण्यासाठी याबाबत   पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात यावे याबाबतच्या सूचना आमदार अण्णा बनसोडे यांनी समिती ला केल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

89 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!