Google Ad
Editor Choice

जलशुध्दीकरण केंद्र निगडी येथे २४ तास पाणीपूरठ्याबाबत … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ व महापौर ‘माई ढोरे’ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आणि वृक्षारोपण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ऑक्टोबर२०२१) : जलशुध्दीकरण केंद्र निगडी येथे मा. महापौर श्रीम. माई ढोरे , मा. आमदार श्री. लक्ष्मण जगताप, मा. नगरसदस्य श्री. सागर आंगोळकर , पाणीपुरवठा विभाग प्रमुख श्री. प्रविण लडकत , विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अशोक अडसुळ व उपअभियंता वर्ग यांचे उपस्थित पाणीपुरवठा सुधारणाकामी आढावा बैठक घेण्यात आली.

सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे सदरचा पाणीपुरवठा भविष्यात २४ तास करणेचे अनुषंगाने तसेच २४ x ७ योजनेअंतर्गत प्राधिकरण से. २५ येथे प्रायोगीक तत्वावर सुरु केलेल्या २४ तास पाणीपुरवठ्या बाबत आढावा बैठक घेणेत आली. प्राधिकरण से. २५ येथे २४ तास पाणीपुरवठा चालु झाल्यानंतर त्यातून आलेला अनुभव, पाण्याची बचत तसेच नागरिकांच्या प्रतिक्रिया इ. बाबत सादरीकरण करणेत आले.

Google Ad

२४ x ७ योजनेअंतर्गत से.क्र. २३,निगडी पासुन डांगे चौकापर्यंत नव्याने १०००मिमी व्यासाची पाईप लाईन टाकणेत आली आहे. सदर पाईप लाईन मुळे वाकड,थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आणि सांगवी इ.भागांचा पाणीपुरवठा सुधारणार आहे. याशिवाय शहरात २४ x ७ योजना व अमृत योजनेअंतर्गत नागरिकांचे जुने नळ कनेक्शन बदलणेत आले असुन त्याठिकाणी एम.डी.पी.ई पाईप लाईनचे कनेक्शन करणेत आले आहे.

त्यामुळे पाण्याची गळती कमी होऊन पाण्याची बचतही होणार आहे. नागरिकांनी १३५ LPCD या मानांकाप्रमाणे पाणी वापरणे कामी जनजागृती करणेबाबत मा. आमदार यांनी सुचविले. याशिवाय मनपा अंतर्गत येणा-या मोठमोठ्या सोसायट्या यांचे Water Audit केल्यास पाण्याची गळती निदर्शनास येईल या बाबतही त्यांनी सुचना केल्या.

सदरची बैठक झालेनंतर मा. महापौर व मा. आमदार यांनी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमतावाढीच्या प्रकल्पाची व टप्पा १ येथील ८० लक्ष लिटर क्षमतेच्या चालु असलेल्या शुध्द पाण्याच्या टाकीच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केली व तद्दनंतर वृक्षारोपन केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

86 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!