Google Ad
Editor Choice

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे अर्ज करण्याची मुदत वाढविली

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ४ मे २०२२) : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

          पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दि. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यामध्ये सुधारणा करुन दि. १२ मार्च २०२१ रोजी अधिनियम पारीत केला आहे.  त्या अनुषंगाने महापालिका हद्दीतील दि. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दि. १६ डिसेंबर २०२१ अन्वये प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी जाहीर प्रकटन मंजूर केलेले आहे.

Google Ad

या गुंठेवारी योजनेसाठी अर्ज स्विकृतीची मुदत दि. ३० जून २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे अशी माहिती बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!