Google Ad
Editor Choice

राजकारण तापलं ! एफआयआर दाखल होण्याआधीच सोमय्या पिता – पुत्रांची धावाधाव सुरू

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ फेब्रुवारी) : केंद्रीय यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केल्यानंतर आता राज्य सरकारही उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे एफआयआर दाखल होण्याआधीच नील सोमय्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनीही दिल्ली गाठली आहे.

Google Ad

संजय राऊत यांनी या प्रकरणाची कागदपत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवली होती. याच प्रकरणात नील सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. नील यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आमचा तपास सुरू असून, अद्याप एफआयआरही दाखल झालेला नाही, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) न्यायालयाला दिली. आज न्यायाधीश नसल्याने यावर सोमवारी (ता.28) सुनावणी होणार आहे.

किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण होताच ते दिल्लीला रवाना झाले आहेत. ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. सोमय्या यांच्या यादीत अजित पवार, संजय राऊत (Sanjay Raut), अनिल परब, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासह यशवंत जाधव आणि किशोरी पेडणेकर या नेत्यांची नावे आहेत. सोमय्यांचा दिल्ली दौरा आणि त्यांच्या मुलाची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काय म्हणाले होते राऊत?

शिवसेनेचे खासदार राऊत म्हणाले होते की, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्या, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा नील यांची आहे. त्यांचा भागीदार पीएमसी बँक गैरव्यवहारातील आरोपी राकेश वाधवा आहे. पीएमसी गैरव्यवहारातील पैशाची गुंतवणूक त्याने केली. यातून वसई तालुक्यातील गोखीवरे येथे हजारो कोटींचा प्रकल्प उभारण्यात आला. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कोट्यवधीची जमीन घेतली. देवेंद्र लधाणी या फ्रंटमनच्या नावावर ही जमीन घेण्यात आली आणि पैसेही घेण्यात आली. चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटींना घेण्यात आली. एकूण दोन जमिनी घेण्यात आल्या. दुसरी जमीन सात कोटींनी घेण्यात आली.

या जमिनीवर जो प्रकल्प उभा आहे, त्या कंपनीचा संचालक नील सोमय्या आहे. निकॉन फेज 1 फेज 2 हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. हा सगळा पैसा पीएमसी बँकेतील आहे. या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. हरित लवादाने यात लक्ष घातल्यास दोनशे कोटींचा दंड होऊ शकतो. यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताबडतोब लक्ष घालावे, असे माझे आवाहन आहे. सगळ्या प्रकल्पाचे परवाने रद्द करावेत. पीएमसी गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने किरीट अन् नील सोमय्याला ताबडतोब अटक करावी, असेही राऊत म्हणाले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!