Google Ad
Editor Choice

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयाचं Airlift .. ! 470 विद्यार्थ्यांची पहिली बॅच कोणत्याही क्षणी मायदेशी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ फेब्रुवारी) : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना युक्रेनमधून रोमानियामार्गे बाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा भारत सरकारने शुक्रवारी केली.

यानंतर 470 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुसेवा बॉर्डर क्रॉसिंगद्वारे रोमानियाला पोहोचली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, सुसेवा येथील आमची टीम येथील विद्यार्थ्यांना बुखारेस्टला घेऊन जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेनं शुक्रवारी उशिरा हे वृत्त दिलं आहे. सरकार युक्रेनमधून भारतीयांना रोमानियामार्गे आणणार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी एअर इंडिया रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे दोन उड्डाणे चालवेल.

Google Ad

तसंच युक्रेन-रोमानिया सीमेवर रस्त्यानं येणार्‍या भारतीय नागरिकांना भारतीय सरकारी अधिकारी बुखारेस्टला घेऊन जातील जेणेकरून त्यांना एअर इंडियाच्या दोन विमानांनी परत आणता येईल. युक्रेननं गुरुवारी सकाळी आपली हवाई हद्द बंद केली. त्यामुळे भारताला आपल्या नागरिकांना रोमानियामार्गे परत आणावं लागणार आहे.

शुक्रवारी रात्री एअर इंडियाचे बुखारेस्टसाठी उड्डाण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एअर इंडियाचे एक विमान शुक्रवारी रात्री 9 वाजता दिल्लीहून निघेल, तर दुसरे मुंबईहून शुक्रवारी रात्री 10.25 वाजता सुटेल. एअर इंडियाची ही दोन विमाने शनिवारी बुखारेस्टहून भारतासाठी रवाना होतील.

दरम्यान त्याआधी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी सांगितलं की, ते आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे देशात आणण्यासाठी रोमानिया आणि हंगेरीमार्गे निर्वासन मार्ग स्थापित करण्यावर काम करत आहे. वउजहोरोडजवळ चोप-झाहोनी हंगेरियन सीमेवर, चेर्नित्सीजवळ पोरबने-सिरेट रोमानियन सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांचे पथक युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!