Google Ad
Editor Choice

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही … खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना झाला कोरोनाचा संसर्ग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०ऑगस्ट) : कोरोनाच्या संपर्कात आल्यास तो डॉक्टर, आमदार, खासदार, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत कोणाला-कोणालाही ओळखत नाही, तो संपर्कात आलेल्या कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे हेच यावरील रामबाण औषध आहे. त्याचाच प्रत्यय आज शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत:च ट्विट करीत याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन यावेळी खासदार कोल्हे यांनी केलं आहे.

▶️डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट काय आहे?
कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.

Google Ad

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे. दरम्यान, डॉ. कोल्हेंना किमान 14 दिवस आता विलगीकरणात राहावे लागणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

93 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!