Google Ad
Editor Choice

सदभावना दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका … पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी घेतली शपथ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २० ऑगस्ट २०२१) : भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच सदभावना दिनानिमित्त शपथही यावेळी ग्रहण करण्यात आली.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, धनाजी नखाते, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Google Ad

प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.  कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब न करता, वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व मतभेद, विचार विनिमय करुन तसेच संविधानिक मार्गाचा अवलंब करुन सोडविण्याची प्रतिज्ञा, सदभावना दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी समन्वयाने काम करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!