महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथे सामाजिक कार्यकर्ते नितीन सुदाम इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे उद्घाटन आज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारंभास उद्योजक संजय दळवी, संतसेवक दौलतभाऊ कामठे, शिवाजीराव दळवी, ज्ञानोबा वांजळे, ज्ञानेश्वर नांदगुडे, प्रकाश कामठे,भुलेश्वर नानगुडे पाटील गणेश कस्पटे सोमनाथ कस्पटे प्रसाद कस्पटे गणेश कामटे माऊली मुरकुटे राजेंद्र टकले काळुराम बानगुडे सदाकाळ नाना, जगदाळे काका, देशपांडे काका, श्री. मोरे, श्री. शिंदे साहेब, पाटील साहेब, दामू जगताप, अशोक बालवडकर, प्रमोद दळवी, चंद्रकांत खवले, साहेबराव नांदगुडे, अशोक शिंदे, बंकट जसाभाटी, बाळासाहेब इंगवले, बाबासाहेब इंगवले, वसंत तांबे संतोष दरेकर भाग्येश पाटुकले जयवंतराव रानवडे, संजय टिळेकर, प्रवीण भालेकर अनिल जेधे महेश चव्हाण चंदन कहार आदी मान्यवर उपस्थित होते.

आज झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 95 नागरिकांनी रक्तदान केले. तसेच 145 नागरिकांनी रक्त तपासणी करून घेतली. सुमारे 74 नागरिकांनी दंत चिकित्सा केली व 40 नागरिकांनी आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आरोग्य विषयी माहिती घेत तपासणी करून घेतली. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि नितीन इंगवले यांच्या कार्याचे कौतुककही केले.