Google Ad
Editor Choice Education

द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक-२९-११-२०२२) : नवी सांगवितील प्रतिभा महिला प्रतिष्ठान, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट या उपक्रमांतर्गत नवी सांगवी येथील फेमस ऍग्रो या शेतकी प्रकल्पास व रोपवाटिकेस भेट दिली.

निसर्ग मानवाच्या किती उपयोगी येतो व आपण त्याचे संगोपन कसे करू शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण या शैक्षणिक क्षेत्रभेट अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात आले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रोपांची नावे व त्यांचा उपयोग यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. आजच्या काळात सेंद्रिय खत सेंद्रिय शेती व त्याचे फायदे यांची योग्य माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. या प्रकल्पात विद्यार्थ्यांना खते शेतीचे अवजारे, रोपे, बिया ,फळझाडे, फुलझाडे, विविध प्रकारच्या कुंड्या गार्डन, साहित्य बाग सजावट साहित्य यांची माहिती देण्यात आली. तसेच सर्व झाडे व रोपे यांचे गुणधर्म व महत्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या प्रकल्पातील श्री जितेंद्र शितोळे, श्री.कृष्णजीत रणवरे यांचे सहकार्य तर सौ. संगीता तितकरे,मिस विदुला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.

Google Ad

या क्षेत्रभेटीस संस्थेचे उपाध्यक्ष श्री विजय अण्णा जगताप, सचिव शंकर शेठ जगताप,सौ.स्वाती पवार यांनी शुभेच्छा दिल्या. पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ जयश्री माळी मॅडम व शिक्षक वृंद यांनी प्रकल्प भेटीचे आयोजन केले .माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.इनायत मुजावर मॅडम , श्री.देवराम पिंजण सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!