Google Ad
Editor Choice

नालासोपारात कॉंग्रेस ला खिंडार, रूचिता नाईक यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ नोव्हेंबर) : नालासोपारात कॉंग्रेस ला खिंडार, रूचिता नाईक यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सक्रिय असलेल्या कॉंग्रेस समेळगाव अध्यक्षा रूचिता नाईक यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादामुळे अध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आपल्या समर्थकांसह जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष यांनी स्वागत करत पक्ष कार्यास शुभेच्छा देत महिला आघाडी शहर संघटक नालासोपारा शहर (प) प्रभाग समिती (ई) हि मोठी जबाबदारी रूचिता नाईक यांना देण्यात आली.

बहुजन पँथर जिल्हाध्यक्ष महेश निकम व शाखा प्रमुख असिफ शेख यांनी हि रूचिता नाईक यांचे काम पाहुण त्यांना पाठिंबा दिला. पक्ष संघटना वाढवण्यासाठी तसेच नालासोपाराचा विकास, सामान्य नागरीकांचा समस्या प्रशासना कडुन कामे करून घेण्यासाठी व शासकीय योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवुन देण्यासाठी व महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द राहिल असे रूचिता नाईक यांनी सांगितले..

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!