Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मानवी हक्क संरक्षणमुळे भटकंती करणाऱ्या मेंढपाळांची दिवाळी आनंदात साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : औध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गेल्या तीन चार महिन्यापासून कोरोनाच्या काळात वास्तव्यास असणाऱ्या भटकंती करून शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या मेंढपाळांची अत्यंत बिकट आवस्थेत जिवन जगत आहेत .त्यांना शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही. आपण सर्वजण दिवाळी असो किंवा अन्य धार्मिक सण आसोत आपण आनंदाने आपल्या घरी साजरे करत आसतो याला अपवाद आहेत मेंढपाळ .थंडीच्या दिवसात ही उघडयावर प्रपंच थाटुन उघडयावर झोपतात व स्वयंपाक ही उघडयावर करतात. अनेकदा त्यांना भटक्या कुत्र्यांचा व गावगुडांच्या त्रासाला समोरे जावे लागते. त्यांची मुलेही शिक्षणाच्या अभावाने मुख्य प्रवाहा पासून वंचित राहतात.

Google Ad

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या माध्यमातून दरवर्षी गेल्या दहा वर्षापासून वेगवेगळ्या अनाथश्रमात व अंःध कल्याण केंद्रात जाउन त्यांना जेवण, फराळ व कपडे देत असतात .यावर्षीही त्यांच्या बरोबरच भटकंती करणाऱ्या मेंढपाळ व त्याच्या कुटुंबायाची फराळ व लहान मुलांना प्रत्येकी दोनदोन नवीन कपडे, भगिनींना तीन तीन नवीन साडया देऊन त्यांची दिवाळी साजरी केली. आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून तेथील लहान मोठ्या पंधरा मुला-मुलीना व भगिनींना नवीन साडया व कपडे देण्यात आले.

त्याचबरोबर फराळ देऊन त्यांचा दिवाळी सण गोड केला. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच खरी दिवाळी साजरी झाल्याचे समाधान झाले असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले .यावेळी जोगदंड यांनी सांगितले की आपल्या उपनगरात काही ठिकाणी मेंढपाळ आसतील तर आम्हाला कळवण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.

विकास कुचेकर म्हणाले की नागरीकांनी आपआपल्या भागातील वास्तव्यास असलेल्या मेंढपाळास दिवाळीच्या सणासाठी मदत करुन सामाजिक बांधिलकीची माणूस की दाखवावी.

७० वर्षीय तांबे म्हणाले ‘आज तुमच्या मुळे आमच्या कुटुंबाची दिवाळी गोड झाली तुम्ही आमच्या लेकराचे  मायबाप झालात त्यांचे डोळ्यातुन अश्रू आले .आमच्या वेदना तुम्हाला कळल्या पण एसीत खुर्चीत बसलेल्या मायबाप सरकारला का दिसत नाही?,असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचाराला तेव्हा आम्ही सर्व जन निःशब्द झालो व आम्हाला आमच्या गरीबीची जाणीव झाली.

मीना करंजावणे म्हणाल्या ‘कि  तज्ञांच्या मते एक नागगोळी पेटवली तीन हजार सिगारेट ओडल्यासारखे, एक हजार लवंगी पेटवली तर सतराशे सिगारेट ओढल्यासारखे तर एक भुईचक्कर पेटवल्यास दोन हजार सिगारेट ओडल्यासारखे आहे त्यामुळे फटाके न वाजवण्याचे त्यांनी नागरिकांना आव्हान केले.

त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक् विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्याक्षा संगिता जोगदंड, मुळशी विभाग प्रमुख मिनाताई करंजावणे,सा.का अंकुश मोरे ,आळंदी सचिव रवी भेंकी, अँड सचिन काळे, गजानन धाराशिवकर, धनंजय महाले ईत्यादी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!