Google Ad
Articles Pimpri Chinchwad

सांगवी : कावेडीया ज्वेलर्स च्या दिवाळी ऑफरला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद …

महाराष्ट्र 14 न्यूज : सांगवीतील कावेडीया ज्वेलर्स प्रा. लिमिटेडमध्ये दिवाळी निमित्ताने सुरू केलेल्या ऑफरमध्ये सोन्याच्या दागिने खरेदीला ग्राहकांनी पसंती देत खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी केली आहे. गेल्या अनेक वर्षांची सोने चांदी विक्रीची परंपरा आणि ग्राहकांची विश्‍वसनीय ठिकाण पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील कावेडीया ज्वेलर्स असून यावर्षी दिवाळीनिमित्ताने ऑफरमध्ये सोने खरेदी करून ग्राहक मजुरीवर मिळणाऱ्या बंपर ऑफरचा लाभ घेत आहेत.

सांगावीतील ‘कावेडीया ज्वेलर्स’ मध्ये विविध वजनातील दागिने ठेवण्यात आले असून दिवाळीनिमित्त बंपर धमाका योजना सुरु करण्यात आल्या आहेत. विनम्र सेवा, आकर्षक व नवीन डिझाईन्स, खात्रीशीर व्यवहार यामुळे कावेडीया ज्वेलर्स ग्राहकांच्या विश्‍वासास पात्र ठरले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ते पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत कार्यरत आहेत. कावेडीया ज्वेलर्सतर्फे दरवर्षी सण समासरंभानिमित्त ग्राहकांवर विविध ऑफर्सचा वर्षाव होत असल्याने सणानिमित्त सोन्याची खरेदी ग्राहकांसाठी फायद्याची ठरते. सणासुदीच्या निमित्ताने सोन्या-चांदीच्या दागिण्यांची खरेदी होत असते. कावेडीया ज्वेलर्सने या दागिण्यांमध्ये नाविण्यपूर्ण डिझाईन्स उपलब्ध केल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड मधील विविध भागातील ग्राहक येथे खरेदीसाठी येत आहेत.

Google Ad

यावेळीही या आगळ्या वेगळ्या ऑफरचा ग्राहकांना मोठा फायदा होत असल्याने त्यांनी सोने खरेदीला गर्दी केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवित असल्याने यावर्षी ‘ सोने खरेदी च्या मजुरीवर २४९ * ( घडणावळ रु. २४९* प्रति ग्रॅम पासून ) पासून बंपर सूट ‘ ही ऑफर खास ग्राहकांसाठी आणली आहे. करोनाचे संकट असूनही सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी ही ऑफर दि. १० नोव्हेंबर २०२० पासून पुढे दहा दिवस सुरू रहाणार असून या काळासाठी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे ग्राहकांमधून सर्वत्र कौतुक होत आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कावेडीया ज्वेलर्समध्ये टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरीसह नववधू अलंकार व दागिने विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सचोटी स्नेह व ग्राहकांच्या प्रेमामुळेच प्रगतीचा आलेख उंचावला :-

कोरोनाचे मोठे संकट सगळीकडे आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये ग्राहकांचा फायदा समोर ठेवून ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांना सततच नाविन्यपूर्ण दागिने देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ग्राहकांना चांगली सेवा देताना पैसे कमी मिळाले तरी चालतील पण ग्राहकांचे समाधान व फायदा हेच आमचेही समाधान आहे, त्या दृष्टीने आम्ही सोन्या-चांदीचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांच्या प्रेमामुळेच आमच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. यापुढील काळातही नवीन योजनेसह नाविन्यपूर्ण सोन्या चांदीचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती कावेडीया ज्वेलर्सचे प्रा. लिमिटेडचे मालक रवी कावेडीया यांनी दिली.

( *नियम व अटी लागू राहतील. )

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!