Google Ad
Editor Choice

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात साकारणात क्रीडा विहार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जून) :  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा भोसरीतील ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांनी सुरु केलेल्या विकासकामांमध्ये आणखी एक नवा अद्याय जोडला जाणार असून प्रभाग क्रमांक पाचमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये क्रीडा विहार साकारले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या  हस्ते  उद्या (शनिवार दि. 11) करण्यात येणार असल्याची माहिती, अजितभाऊ गव्हाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नगरसेवक म्हणून काम करताना अजितभाऊ गव्हाणे यांनी परिसराचा कायापालट करताना अनेक आरक्षणे विकसीत करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधील आरक्षण क्रमांक 402 विकसीत करून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची अजितभाऊंनी यापूर्वीच निर्मिती केली आहे. या उद्यानामुळे परिसरातील लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, भव्य लॉन अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता याच उद्यानातील मोकळ्या जागेमध्ये क्रीडा विहाराची निर्मिती करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कामासाठी प्रयत्न करणार्‍या अजितभाऊंना यश आले असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी होणार आहे.
या क्रीडा विहारासाठी सुमारे दीड कोटींचा खर्च करण्यात येणार असून पुढील वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये हे विहार नागरिकांसाठी खुले होणार आहे. उद्यानामध्ये फिरावयास येणार्‍या नागरिकांसाठी योगा करणे, ध्यान करणे, टेबल टेनिस, कॅरम आदी खेळाकरीत साहित्य व सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे. सदरचे विहार हे दोन मजली असणार असून तळमजल्यावर योगा हॉल, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह तसेच विहाराचे कार्यालय असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर टेबलटेनिस व कॅरम या खेळांसाठीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अजितभाऊ गव्हाणे यांच्यामुळे निर्माण होत असलेल्या या सुविधेचे प्रभागातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!