Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत जाहिरातींबाबत काही तक्रार असल्यास आता येथे करा तक्रार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जून) : शहरातील विविध ठिकाणी विनापरवाना लावल्या जाणा-या जाहिरात फलकांमुळे होणा-या विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्याच्या हेतुने मा. उच्चन्यायालय मुंबई येथे क्र. १५५/२०११ अन्वये दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. ०६/०८/२०१४ रोजी आदेश दिलेले आहेत.

त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने महानगरपालिकेतील क्षेञीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेञासाठी प्राधिकृत केले आहे. सबब, सर्व नागरिकांना या पञाकाद्वारे आवाहन करणेत येते की, त्यांनी अनधिकृत जाहिरातींबाबत काही तक्रार असल्यास ती क्षेञीय अधिकारी यांचेकडे नोंदवावी.

Google Ad

जर क्षेञीय अधिकारी यांचेकडून त्यांचे तक्रारीची दखल घेण्यात न आल्यास त्यांनी याबाबत नोडल ऑफिसर तथा सहा आयुक्त (परवाना) यांचेकडे दाद मागावी. नागरिकांच्या तक्रारीसाठी दुरध्वनी क्रमांक 67333333 विस्तार 1122 व टोल फ्री क्रमांक 8888006666 असा आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!