Google Ad
Editor Choice

दापोडीत शिवसेनेच्या वतीने पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने भक्तांना फराळाचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ऑगस्ट) : दरवर्षी श्रावणी सोमवार, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्या या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी दापोडीतील महादेव मंदिरात पाहायला मिळते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काळजी घेऊनच मंदिरात श्रावणी सोमवार साजरा होत असल्याचे दिसून आले. हजारो भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिर दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते मात्र, यंदा शासनाकडून घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून येथे विधिवत पूजाअर्चा करण्यात आली.

दापोडीत आज सौ.सुषमाताई अजित शेलार ( गायकवाड) शिवसेना महिला अध्यक्ष दापोडी यांच्या वतीने श्रावणी सोमवार शिवपूजन चे औचित्य साधुन दापोडी गावठान मधील शंकर मंदिरा मध्ये श्रावणी पहिला सोमवार निमित्त दर्शन घेण्या साठी येणा-या सर्व भक्ताना उपवासा निमित्त केळी वाटप करण्यात आले.

Google Ad

यावेळी महिला आघाडीच्या सौ.सुषमाताई अजित शेलार ( गायकवाड) सोबत त्याचे सहकारी लक्ष्मीताई जावळे, संदिप कांबळे , शाहनवाज शेख , सागर काटे, आशिष शेलार अदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दापोडी गावठान मधील स्थानिक गावकरी यांनी सहकार्य केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

48 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!