Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडकरांसाठी मोठी बातमी : उद्यापासून अनलॉक; पाहा पिंपरी चिंचवडमध्ये काय सुरु-काय बंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ऑगस्ट) : कोरोना संसर्ग कमी होत असल्याने प्रशासनाने मुंबई आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. पण दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये मात्र निर्बंध कठोरच होते. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाने सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्य सरकारने पिंपरी चिंचवडच्या लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढाव बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यात असणारे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करत असल्याची माहिती दिली. यावेळी दुकानांसह हॉटेलं सुरु ठेवण्याची वेळ देखील वाढवून देण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात आता मॉल देखील सुरु करण्यात येणार आहे. पण मॉलमध्ये ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले आहेत त्यांना प्रवेश दिला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Google Ad

पिंपरी चिंचवड व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आज (8 ऑगस्ट) घेतलेल्या निर्णयाने खूप मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजेश पाटील , आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका , पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करत आदेश दिले आहेत.

▶️अंशतः शिथिलता देत पिंपरी चिंचवड शहरात काय सुरू काय बंद राहणार :-
१ ) अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस पूर्ण वेळ सुरु राहतील .
२ ) अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना वगळता इतर दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस रात्री ०८.०० वाजेपर्यंत सुरु राहतील ( त्या दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून ) .

३ ) शॉपिंग मॉल लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांकरिता रात्री ०८.०० वाजेपर्यंत सुरु राहतील . तथापि , नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण झालेबाबत प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील . शॉपिंग मॉल मध्ये काम करणा – या कामगार व इतर व्यक्तीची रॅपिड अॅटिजेन चाचणी ( RAT ) प्रत्येक पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक राहील , कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मॉल व्यवस्थापनाची राहील .

४ ) रेस्टॉरंट , बार , फूड कोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री १०.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने सुरु राहतील . घरपोच सेवा ( Home Delivery ) रात्री ११.०० पर्यंत सुरु राहतील . सर्व रेस्टॉरंट , बार , फूड कोर्ट इ . यांना दर्शनी भागावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या सुचनांचे स्टीकर्स लावणे बंधनकारक असेल .

५ ) जलतरण तलाव व निकट संपर्क येणारे सर्व क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळ हे नियमितपणे सुरु राहतील .
६ ) सार्वजनिक उद्याने आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेत सुरु ठेवता येतील .
७ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक , माध्यमिक शाळा , महाविद्यालये , शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील . मात्र ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील .

८ ) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस ( Couching classes ) हे सर्व दिवस रात्री ०८.०० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने सुरु राहतील . सदर ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण ( किमान एक डोस ) अनिवार्य आहे . ९ ) व्यायाम शाळा ( Gym ) , सलून , ब्युटी पार्लर , स्पा , Wellness centers आसनक्षमतेच्या ५० % क्षमतेने पुर्व नियोजित वेळेनुसार ( By appointment ) रात्री ०८.०० वाजेपर्यंत सुरु राहतील , सदर ठिकाणी वातानुकुल ( A.C. ) सुविधा वापरता येणार नाही .
१० ) सर्व प्रकारची धार्मिक स्थळे मा . राज्य शासनाच्या पुढील आदेशापर्यत बंद राहतील .

११ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्री ११.०० वाजेपर्यंत जमावबंदी असेल व रात्री ११.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत ( अत्यावश्यक कारण वगळता ) संचार बंदी लागू राहील . १२ ) या आदेशातील नमूद बाबी व्यतिरिक्त इतर बाबींसाठी दि . २६.०६.२०२१ निर्गमित आदेश लागू राहतील .
१३ ) मा . राज्य शासनाने व इकडील संदीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील ,

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!