Google Ad
Editor Choice

Dhule : कीर्तन सुरु असतानाच कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : साक्री तालुक्यातील निजामपूर जवळ असलेल्या जामदा गावात कीर्तन सुरु प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे.

दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कीर्तन सुरु झाल्यानंतर ताजुद्दीन महाराज यांना अवघ्या 45 मिनिटात त्रास जाणवू लागला. यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

Google Ad

कीर्तनकार ताजुद्दीन महाराज हे जन्माने जरी मुस्लीम असले तरी त्यांनी वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारली होती. ह.भ.प. ताजुद्दीन महाराज नित्य हरिपाठ, भजन-कीर्तन करायचे. त्यांनी आतापर्यंत प्रत्येक वारीला हजेरी लावली आहे. त्यांच्या मृत्यूने धुळे जिल्हा आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!