Google Ad
Editor Choice Education

सांगवीतील ‘डोनेट एड सोसायटी’च्या ‘सारिका भंडलकर” यांच्या वतीने महिलांच्या करीता … ज्ञानज्योती शैक्षणिक उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ सप्टेंबर) : नाते जिव्हाळ्याचे , कार्य समृद्धीचे .. !

ज्ञानज्योती शैक्षणिक उपक्रम समाजामध्ये महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते.यातील एक प्रमुख समस्या म्हणजे अपूर्ण शिक्षण.आर्थिक परिस्थिती , कौटुंबिक कारणे किंवा इतर अनेक घटकांमुळे महिलांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते.अर्धवट शिक्षणामुळे त्या आपल्या मुलांचा योग्य प्रकारे अभ्यास घेऊ शकत नाहीत . किंवा शासकीय कामे करताना त्यांना अडचणी येतात.अश्या सर्व गोष्टींचा विचार करून चिंचवड विधानसभा मतदारसंघांचे कार्यसम्राट आमदार मा.जगताप लक्ष्मण पांडुरंग यांनी महिलांसाठी ज्ञानज्योती शैक्षणिक उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे .

Google Ad

या उपक्रमा अंतर्गत महिलांना किमान १० वी किंवा १२ वी पर्यंत शिक्षण मिळावे यासाठी त्यांचे अतिशय अत्यल्प दरात फॉर्म भरून घेऊन त्यांना बहिस्थ पद्धतीने १० वी किंवा १२ वी ला प्रवेश देण्यात येणार आहेत.तसेच त्यांना पुस्तके पुरवण्यात येणार आहेत.त्यांची या विषयाची तयारी करून घेण्यासाठी त्यांना विविध विषयाची व्याख्याने , तयारी सत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तज्ञ शिक्षकांकडून करून घेण्यात येणार आहे.जेणेकरून मुलगी शिकली प्रगती झाली या उक्तीला अनुसरून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले तर त्यांचे सामाजिक , कौटुंबिक स्तर उंचावेल . त्यांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील . आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम होतील .

▶️अधिक माहितीसाठी संपर्क : सारिका कृष्णा भंडलकर ( गमरे ) -९ ५६१३८३८३८ ( अध्यक्षा : डोनेट एड सोसायटी )

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!