Google Ad
Editor Choice

दापोडी येथील सामान्य कुटुंबात राहणाऱ्या ‘धम्मरत्न गायकवाड’ या विद्यार्थ्यास 92 लाखाची स्कॉलरशिप … ‘शंकर जगताप’ यांनी दिली कौतुकाची थाप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ ऑगस्ट) : आज शनिवार दि १३ ऑगस्ट २०२२ रोजी पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप ह्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप यांच्या हस्ते धम्मरत्न गायकवाड या गुणवंत विद्यार्थ्याला जपान येथे शिक्षणासाठी 92 लाखाची स्कॉलरशिप मिळाली त्या निमित्त त्याला पुढील वाटचालीसाठी पुष्पगुच्छ शाल व संविधानाची प्रत भेट म्हणून देऊन सन्मानित केले व शुभेच्छा दिल्या.

दापोडी येथे एक सामान्य कुटुंबात राहणाऱ्या धम्मरत्न गायकवाड हा विद्यार्थी संपूर्ण भारतात 92 लाखाची स्कॉलरशिप मिळवणारा या वर्षीचा भारतातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

Google Ad

धम्मरत्न गायकवाड यांनी ही स्कॉलरशिप मिळवून भारता मध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवला. जपान मध्ये शिक्षणाला गेल्यानंतर तेथे कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही त्यास सदैव मदत करू असे आश्वासन ह्या प्रसंगी माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी दिले.


यावेळी माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, महेश जगताप, सोमनाथ काटे, गणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, संजय गांधी निराधार योजनेचे समिती सदस्य संजय मराठे, शिवाजी कदम, अनिल कांबळे,धम्मरत्न गायकवाड यांची आई निता देविदास गायकवाड, वैशाली खरात, कल्पना शिंदे, संगिता डिखळे, ज्योती कोळी, सुनिता कुॅवर, स्वाती गुरव, मनिषा हंगरगे, वैशाली घाडगे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!