Google Ad
Editor Choice

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी सांगवीत भव्य तिरंगा रॅली … विद्यार्थी आणि देशप्रेमी नागरिकांचा मोठा सहभाग!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ऑगस्ट २०२२) : आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.

आपला भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत असताना हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्योत्सव ज्यांच्या बलिदानामुळे आज आपणास पाहायला मिळत आहे, अशा विविध स्वातंत्र्यवीर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नवी सांगवी-पिंपळे गुरव परिसरात भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली, नव्या पिढीला या वैभवशाली स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास समजावा हाच या रॅलीचा उद्देश होता. नवी सांगवी कृष्णा चौक येथील भाजपच्या सांगवी – काळेवाडी मंडलच्या कार्यालयासमोर भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात ध्वाजारोहण करून या रॅलीस प्रारंब झाला.

Google Ad

भारत माता की जयच्या जयषोघाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. नवी सांगवीकर मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ढोल पथकाचा ठेका आणि ताल, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शिक्षक घोषणा यांनी नवी सांगवी परिसरात यावेळी स्वातंत्र दिन अनोख्या पध्दतीने साजरा केला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशाबद्दल आपुलकी व देशभक्ती वाढावी यासाठी विद्यार्थी नागरिकांनी संचलन केले. ही तिरंगा रॅली कृष्णा चौक – क्रांती चौक- फेमस चौक- साई चौक तसेच महेश्वरी चौक – एम एस काटे चौकातून पुन्हा कृष्णा चौकात अली. यावेळी नागरिकांनी भारत माता की जय” च्या घोषणा देत रंगीबेरंगी फुलांची उधळण करत आनंद घेतल्याचे दिसून आले.

यावेळी तिरंगा रॅलीमध्ये माजी महापौर माई ढोरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापूरे, उद्योजक विजय जगताप, अंबरनाथ कांबळे आदी माजी नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते तसेच मास्टर माइंड स्कूल, न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूलचे विद्यार्थी व परिसरातील देशप्रेमी नागरिक मोठया संख्येने रॅलीत आनंदाने सहभागी झाले होते.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!