Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मध्ये सयुक्त जयंतीच्या निमित्ताने धम्म पहाट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मे) : विश्वभुषण,बोधिसत्व, भारतरत्न प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समीती जुनी सांगवी,नवी सांगवी, पिंपळे गुरव,औंध कँम्पच्या वतीने पी डब्ल्यु डी नवीसांगवी येथील मैदानावर धम्म पहाट या भीमबुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तथागतांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास संयुक्त जयंती समिती अध्यक्ष विजय गायकवाड यांनी तर महामानवांच्या प्रतिमांना सुजाता निकाळजे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संदीप नितनवरे यांनी बुद्ध वंदना घेतली.

Google Ad

तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 व्या जयंती निमित्त बोधिसत्व सहकारी रुग्णालय पुणे यांच्या सौजन्याने 125 वी संयुक्त जयंती महोत्सव समितीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आरोग्य शिबिरासाठी रुग्णालयाचे अध्यक्ष एम. एल. सुखदेवे साहेब, डॉ. पी. टी. गायकवाड, डॉ. आयरेकर मॅडम, डॉ. लोंढे व सहकारी इत्यादींनी योगदान दिले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समीतीचे अध्यक्ष विजय गायकवाड, कार्याध्यक्ष संदीप नितनवरे,गजानन कांबळे, विकास साळवे,अँड राजेश नितनवरे,राहुल काकडे,संजय मराठे,राहुल वाघमारे,विजय मागाडे,शंतनु डोळस,सुरेश सकट,राजेंद्र ङोनोलीकर, सुनिल कांवळै,चंद्रकांत वाकोङे,पोर्णिमा आमराव, सुजाता निकाळजे, गौतमी आमराव, आदीनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ: पी डब्ल्यु डी मैदान नवीसांगवी येथील धम्मपहाट कार्यक्रमात भीमबुद्ध गीतांचा येवले बंधु आयोजित “बुद्धं सरणं गच्छामी” गीत सादर करताना कलाकार.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!