Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मनपाच्या जनसंवाद सभेत तक्रारींचे निवारण जलदगतीने … नागरिकांनी विचारले हे प्रश्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १७ मे २०२२) : जनसंवाद सभा सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावी संवाद माध्यम ठरत आहे. या सभेमध्ये आलेल्या तक्रारवजा सूचनांवर सत्वर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन करावे असे निर्देश जनसंवाद सभांचे नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रशासनाला दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली.

Google Ad

आज झालेल्या जनसंवाद सभेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, रस्त्यालगतचे पदपथ दुरुस्त करणे, रस्त्यांवर पथदिवे बसवणे, कामानिमित्त उखडण्यात आलेले रस्ते लवकर दुरुस्त करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसवणे, उच्च दाबाने, सुरळीत पाणीपुरवठा करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, सार्वजनिक शौचालये उभारणे, रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे होणारी अडचण दूर करणे, आरोग्य आणि स्वच्छता संबंधी नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविणे अशा तक्रारवजा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

कासारवाडी येथील ‘ह’ प्रभाग कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत,१३ इतक्या नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

▶️नागरिकांनी विचारले हे प्रश्न :
संत तुकाराम नगर (YCM हॉस्पिटल) येथील गोल मार्केट बाहेर परवाना धारक यांची टपरी परवाना असतानाही ती मनपाच्या अतिक्रमण विभागाने उचलली, या कारवाईत भेदभाव केला जातो.
अभिजित गोफण (सामाजिक कार्यकर्ते)

कासारवाडी दफनभूमी ची समस्या निर्माण झाली आहे, मोकाट जनावरे आत घुसत आहेत. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने पत्रे लावावेत. तसेच बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात प्रशिक्षण घेत असलेल्या नागरिकांकडून जादा दराने आकारणी केली जाते, ती कमी करावी, तसेच मनपाने ठेकेदाराला दिलेल्या नियमाने फी आकारणी करावी.
मझहर शेख (नागरिक, कासारवाडी)

पिंपळे गुरव नवी सांगवी भागात स्मार्ट सिटी अंतर्गत कांकरिया गॅस गोडाऊन तसेच इतर ठिकाणी करण्यात आलेल्या रस्त्यावर गतिरोधकावर थर्मोप्लास्ट चे पांढरे पट्टे मारावेत. **  नवी सांगवी तील प्रभाग ३१ मधील साई चौक ते फेमस चौक दरम्यान रखडलेल्या रस्त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याने तात्पुरती दुरुस्ती करावी. **  सांगवी पोलीस चौकी ते सांगवी फाटा भूमिपूजन झालेल्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे  रखडलेल्या कामाची माहिती घेऊन ते सुरू करावे. ** सांगवीतील विष्णुपंत ढोरे चौक ते महाराष्ट्र बँक व नवी सांगवीतील फेमस चौक ते ढोरे फार्म पदपथावर लावण्यात आलेली पामची झाडे सुकुन गेल्याने त्यास पाणी देऊन देखभाल दुरुस्ती करावी.
डॉ.देविदास शेलार (नागरिक)

▶️अधिकारी म्हणाले :

सर्व अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे करण्यात यावी, स्थापत्य विभागास सर्व नाल्यांची नावे तसेच लांबी रुंदीची माहिती टाकून पत्र द्यावे, तसेच स्पायडर मागवून घ्यावेत, आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात यावा.
थोरात विजयकुमार (क्षेत्रीय अधिकारी )

पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून घ्यावेत, ओला व सुका कचऱ्याचे बीनचे वाटप करावे, स्वच्छता गृहाचे दरवाजे बोर्ड दुरुस्ती करून घ्यावे.
संजय कुलकर्णी (सह शहर अभियंता)

विकास ढाकणे म्हणाले, जनसंवाद सभेत आलेल्या तक्रारी, सूचनांवर कार्यवाही करत असताना निर्माण होणारे प्रश्न, अडचणी याबाबत सबंधित अधिकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन करावे, नागरिकांचे प्रश्न लवकर सोडवण्यासाठी आराखडा तयार करून करत असलेल्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेतला पाहिजे. त्याच तक्रारी पुन्हा उदभवू नये यासाठी विशेष उपाय योजना तयार करून त्यावर अंमल करणे गरजेचे आहे. सोडवलेल्या प्रश्नांबाबत संबंधित नागरिकांना अवगत करावे. त्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या पाहिजेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!