Google Ad
Editor Choice india

Delhi : शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना … नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज : कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या योजनेला उद्या (ता. ९ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रारंभ होत आहे. एक लाख कोटी रुपयांच्या या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेद्वारे शेतीच्या हंगामानंतरच्या कामांसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यावेळी उपस्थित राहतील.

कोरोना संकटामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्रसरकातर्फे जाहीर झालेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.
त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळानेही 1 लाख कोटी रुपयांच्या या योजनेवर औपचारिक मंजुरीची मोहर उठवली आहे. कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त असलेल्या शीतसाठवण गृहे, संकलन केंद्र उभारणी, प्रक्रिया उद्योग यासारख्या पायाभूत सुविधांसाठी याद्वारे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. शेतीमालाचे नुकसान टाळणे आणि शेतकऱ्यांना किफायतशीर दाम मिळणे अपेक्षित आहेत.

Google Ad

या योजनेंतर्गत एक लाख कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या वित्तपुरवठादार संस्थांकडून केला जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील 11 बॅंकांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधिक सामंजस्य करार केला आहे. व्याजदरात 3 टक्क्यांची वलत आणि 2 कोटी पर्यंतच्या कर्जाची पतहमी लाभार्थ्यांना मिळेल. त्यात शेतकरी, सहकारी पतसंस्था, बहुद्देशीय संस्था, बचतगट, कृषी उद्योजक, स्टार्टअप यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनाही खासगी-सरकारी भागीदारीतून वित्तपुरवठ्याचा लाभ घेता येईल.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते योजनेचे उद्घाटन होणार असून यादरम्यानच प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्यांना 17 हजार कोटी रुपयांचा सहावा हप्ता देखील वितरीत केला जाणार 1 डिसेंबर 2018 ला सुरू झालेल्या योजनेंतर्गत आतापर्यंत 9.9 कोटी शेतकऱ्यांना 75 हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही रक्कम योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यांमध्ये जमा केली जाते. ही बॅंक खाती आधारशी जोडलेली आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!