Google Ad
Editor Choice Education

देवांग कोष्टी समाज ‘ पुणे यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत ..अनोखा उपक्रम !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ऑगस्ट) : देवांग कोष्टी समाज ‘ पुणे यांचा सामाजिक बांधिलकी जोपासत ..अनोखा उपक्रम घडवला. बालगृहोतील ४५ अनाथ निराधार मुलांना सहलीचे निमित्ताने  देवदर्शन घडवले. मंचर – भिमाशंकर रोड वरील पळसठीका ( घोडेगाव ) येथील .. बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपण केंन्द्र येथील बालकांना देवांग कोष्टी समाज पुणे यांच्या वतीने सहलीचे करण्यात आले होते .

‘आपणही असे काही तरी करू या’ … माणूस म्हणून जगू या !

यावेळी सहली करीता आयोजन केलेल्या बसचे पुजन व उद्घाटन कार्यक्रमास देवांग कोष्टी समाज पुणे चे अध्यक्ष सुरेश तावरे, सचिव सुनील ढगे, युवा अध्यक्ष.दत्ता ढगे व भरत आमने सल्लागार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रथम सर्व मुलांनी क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजाचे समाधीचे दर्शन घेतले .

Google Ad

त्यानतर भव्य दिव्य असे ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी मंदीर पाहुन  पुढे देहु येथे श्री संत तुकोबाराय यांचे समाधीचे दर्शन घेऊन, भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांच्या मंदीरात  दर्शन घेऊन तेथे महाप्रसादाचा लाभ घेतला . यावेळी .. संस्थेचे खजिनदार श्री भगवानराव गोडसे . ज्येष्ठ सल्लागार श्री मल्हारराव ढोले ‘ त्याचप्रमाणे सहसचिव सुनील डहाके कार्याध्यक्ष अशोक भुते ‘ सदस्य : सतीश लिपारे ‘ शशिकांत दवंडे ‘ मनिल ढगे ‘ अशोक ढेकणे व महिला अध्यक्ष स्वाती डहाके इ मान्यवर उपस्थित होते .

भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त श्रीयुत झोपाशेठ पवार यांनी श्री . सुरेश तावरे ‘ बालगृह व्यवस्थापक व संस्थासचिव विलास पंदारे यांचा ‘ सत्कार ‘ करणेत आला व सर्वांनी ‘ भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला . त्यानंतर सर्व मुलांना प्रति शिर्डी येथे ‘ साईबाबाचे दर्शन ‘ घेण्यात आले .

पुढे .. शिरगाव येथील .. भव्य दिव्य श्री गणेशाची मुर्तीचे दर्शन घेतले व गणेश स्तोत्र ‘ म्हणुन श्री गणेशाची पुजा करण्यात आली . या सहलीचे .. प्रवासांसाठी मैत्रेय टूव्हल्स कं ‘ मंचर यांची गाडी नेण्यात आली . माता चौडेश्वरी च्या कृपेनं .. देवांग कोष्टी समाज पुणे .. यांनी केलेल्या सहकार्यामुळेच ..या अनाथ – निराधार लेकरांनी सहलीचा ‘ मनसोक्त आनंद लुटता आला . प्रवासाची ‘ फिरण्याची मजा घेता आली अन् देवदर्शनाचा लाभ झाला, धार्मिक स्थळांची माहीती झाली . यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळेच सांगत होता, मुले खुष झाली ते पाहून .. परमेश्वर खुष झाल्याचे समाधान मिळाल्याचे अध्यक्ष सुरेश तावरे यांनी बोलताना सांगितले.

पहा काय म्हणाले, अध्यक्ष सुरेश तावरे

‘देवांग कोष्टी समाज पुणे’ यांनी केलेल्या सहकार्या बदल बालगृहाचे वतीने सर्वांचे मन : पुर्वक धन्यवाद देत आहे ! अशी ‘ सद्भावना ‘ संस्थासचिव व व्यवस्थापक विलास पंदारे ‘ यांनी व्यक्त केली .

‘यावेळी निस्पृह पणे ‘ या लेकराचा सांभाळ करणारी ‘ वैयक्तीक लक्ष देणारी ४७ बालकांची आई .. सौ . वैशाली पंदारे यांनी ‘ आभार ‘ व्यक्त केले.

अनाथाश्रम

अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत मुलांना व महिलांना आश्रय देणाऱ्या संस्था. मूलत: दारिद्र्य, अपघात, फसवणूक, घटस्फोट, मुलांना व स्त्रियांना टाकून देणे, कुमारी अवस्थेत अगर वैधव्यात मातृत्व येणे वा युद्ध इ. कारणांनी अनाथ व निराश्रितांची संख्या वाढते. त्यांचे उद्ध्वस्त जीवन वसविण्याचा प्रयत्न करणे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक होऊन बसते. अशा वेळी काही दयाळू व कल्याणेच्छू व्यक्ती अशा प्रकारच्या दुर्दैवी जीवांना आधार देण्याकरिता पुढे येतात व त्यातूनच पुढे वैयक्तिक मर्यादा लक्षात घेऊन संघटित

प्रयत्नाने अनाथश्रमासारख्या संस्था निघतात.कोण्या एका व्यक्तीने किंवा संस्थेने असे आश्रम काढण्यापेक्षा सरकारने ते काढणे अधिक इष्ट आहे. मात्र रशियासारखे काही अपवाद वगळले, तर सर्वत्र खाजगी रित्या चालविलेले अनाथश्रम आढळून येतात. सरकार व श्रीमंत दानशूर लोक यांच्याकडून अशा संस्थांना मदत मिळविण्यात येते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!