Google Ad
Editor Choice

पुणे जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेटप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल … आरोग्यमंत्री डॉ . तानाजी सावंत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑगस्ट) : राज्यात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे सत्र सुरूच आहे. पहिली मुलगी असल्याने दुसऱ्यांदा मुलगा व्हावा याकरिता अवैधपणे गर्भपात करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारींतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयात खटला सुरू असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेत दिली.

Google Ad

डॉ. सावंत म्हणाले, ”इंदापूर तालुक्यातील मौजे सराटी या गावाच्या हद्दीत काही लोक बेकायदेशीरपणे गर्भलिंग परिक्षण करीत असल्याची माहिती 13 मे रोजी उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षकांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी भेट दिली असता गर्भलिंग परिक्षण करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात लॅब टेक्निशियन, डॉक्टर आणि वाहन चालकावर गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्रे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.”

अनेक ठिकाणी दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या त्या महिलेकडून मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासरकडून धरला जातो, त्यामुळे सोनोग्राफी करून गर्भलिंग निदान केल्यानंतर मुलगी असली तर गर्भपात करायचा असा हट्ट् धरला जातो.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!