Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नगरसेविका करुणा चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १७ मधील ४१५ जेष्ठ नागरिकांना मोफत एस टी बस पास , पी एम पी एल बस पास चे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्रमणक १७ मधील चिंचवडे नगर विभागात नुकतीच चिंचवडे नगर जेष्ठ नागरिक संघाची स्थापना या प्रभागाच्या नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे व भारतीय जनता पार्टी पिं चिं शहर जिल्हा चे उपाध्यक्ष श्री.शेखर बबनराव चिंचवडे यांच्या माध्यमातून करण्यात आली, शहरातील उपनगरांच्या तुलनेने म्हणजेच रावेत, चिंचवडगाव, निगडी या भागात जेष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे व्यासपीठ उपलब्ध आहे .

मात्र चिंचवडे नगर मध्ये आजपर्यंत जेष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्यासाठी शासकीय योजना, उतारवयात त्यांना विरुंगुळा उपलब्ध व्हावा यासाठी जेष्ठ नागरिक संघ अस्तित्वात आला नव्हता नेमकी हीच गरज ओळखून नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे यांच्या माध्यमातून चिंचवडेनगर जेष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आहे

Google Ad

जेष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेच्या दिवशीच जेष्ठ नागरिकांसाठी मोफत एस टी बस पास, पी एम पी एल बस पास व जेष्ठ नागरिक संघ सदस्यत्व नोंदणी अभियान घेण्यात आले, प्रभागातील तब्बल ४१५ जेष्ठ नागरिक बंधू भगिनींनी यात सहभाग घेतला, सर्व नागरिकांनी जेष्ठ नागरिक संघाचे सदस्यत्व घेण्याबरोबरच मोफत एस टी बस पास, पी एम पी एल बस पास या सेवेचा देखील लाभ घेतला, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व जेष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी एकूण ४१५ जेष्ठ नागरिकांपैकी सलग ४ दिवस टप्प्याटप्प्याने पासेसचे वितरण करण्यात आले यावेळी जेष्ठ नागरिकांनी समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे, भाजपा पिंपरी चिंचवड शहरचे उपाध्यक्ष श्री. शेखर बबनराव चिंचवडे, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र चिंचवडे, चिंचवडे नगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सीताराम रेमजे व नवनिर्वाचित सदस्यांपैकी श्री.उत्तम जगनाथ चव्हाण,श्री नारायण दगडू चिंचवडे,श्री.बाळासाहेब विठ्ठलराव जाधव ,सौ. चंद्रकला दगडू होळ,श्री.अंबादास भाऊराव गते,श्री.सुदाम मारुती पायगुडे ,श्रीमती लीला भीमराव भोसले ,सौ. ज्योती अनिल फेंगसे ,श्री सुमेरचंद ताराचंद रोहिला श्री. बबनराव भिकोबा चिंचवडे उपस्थित होते

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!