Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरवासीयांना मनपाची निःशुल्क अॅम्ब्युलन्स सेवा … कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास साधा या नंबरवर संपर्क!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७एप्रिल) : पिंपरी चिंचवड मनपा अॅम्ब्युलन्स निःशुल्क सेवेबाबत ( १०८ / ०२०-६७३३११५४ / ०२०-६७३३२१०१ ) . पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी वरील नंबर आपण देत आहोत . पिंपरी चिंचवड महानगरपालिका व BVG MEMS ( Maharashtra Emergency Medical Services ) यांच्या संयुक्त विद्यमाने सदरची सेवा पुरविण्यात येणार आहे .

यापुर्वी सगळ्यांना ज्ञात असलेला १०८ क्रमांक व मनपा ०२०-६७३३११५४ / ०२०-६७३३२१०१ या क्रमांकावर फोन केल्यास आपणास तातडीने अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार आहे . जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे सोयीस्कर होणार आहे . सदरचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलेला आहे . सदरची हेल्पलाईन २४x७ उपलब्ध असणार आहे . सदरची संपूर्ण सेवा निःशुल्क असणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी .

Google Ad

शववाहिका ( स्मशानभूमी समन्वय ) सेवा ( ०२०-६७३३११५५ ) पिंपरी चिंचवड मनपाने यापूर्वीच कोरोना आजाराने मृत पावलेल्या रुग्णांसाठी स्मशानभूमीतील प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी सदरची हेल्पलाईन सुरु केलेली आहे . जेणेकरुन कोणत्या जवळच्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णास नेऊन अंतिम संस्कार करता येतील व प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी सदरची सेवा २४x७ सुरु आहे .

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!