Google Ad
Editor Choice

स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ … राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि भाजपा कार्यकर्त्यांत रंगले युद्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मे) : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अमित शहा यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला पुणे दौऱ्यावर आल्या असताना महिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

स्मृती इराणी बालगंधर्व रंगमंदिर मध्ये पोहच्याच्या आधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला पदाधिकारी अगोदरच नाट्यगृहात या ठिकाणी उपस्थित होत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणीयांचे भाषण सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी घोषणा देण्यास सुरुवात केली , त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि या महिलां एकमेकांनामध्ये भिडले व त्याचे रूपांतर हाणामारीत पहायला मिळाले.

Google Ad

मात्र यावेळी पोलिसांनी त्याना रोखलं आणि त्यांच्यात झटापट झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणी यांचा निषेध केला यात राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना भाजप च्या पुरुष कार्यकर्त्या कडून मारहाण करण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!