Google Ad
Editor Choice

Hinjwadi : ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा … हिंजवडी पोलिसांची भन्नाट कामगिरी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ऑक्टोबर) : घरासमोर वाळत घातलेल्या ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागात 38 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. हिंजवडी पोलिसांनी हत्येचा तपास करत शेजाऱ्याला अटक केली.

पिंपरी चिंचवडत हिंजवडीमधील साखरे वस्ती भागात 3 ऑक्टोबर रोजी संतोष माने या 38 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. राहत्या घरी धारदार शस्त्राने वार करुन संतोषची हत्या करण्यात आली होती. पत्नी सरस्वती माने यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. हिंजवडी पोलिसांनी खुनाचा उलगडा करत शेजारी राहणाऱ्या 23 वर्षीय कैलास डोंगरे याला अटक केली आहे.

Google Ad

सुरुवातीला आजूबाजूच्या व्यक्तींकडे चौकशी केली असता नवीन कोणाीच आलं नसल्याचं समजलं. त्यामुळे कोणी आणि का संतोषची हत्या केली, हा प्रश्न पोलिसांना पडला होता. पोलीस तपास करत असताना शेजारी राहणाऱ्या घरासमोर कपडे वाळत घालण्यात आले होते, त्यात केवळ अंतर्वस्त्र ओले असल्याने पोलिसांना शंका आली.

घरातील सर्व कपडे वाळलेले असताना केवळ एक अंडरवेअर ओली का? या मुलाने इतक्या रात्री आंघोळ का केली असेल? असा प्रश्न सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारणे यांना पडला. त्याचा कसून तपास केला असता आरोपीने खुनाची कबुली दिली.

मयत संतोष माने आणि त्याची पत्नी सरस्वती माने यांचे आरोपी कैलास डोंगरेच्या आई वडिलांबरोबर सातत्याने भांडण होत असे. या कारणावरुन आपण त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!