Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात चाललंय काय ? भाडोत्री गुंडांना बोलावून शेजाऱ्यांना मारहाण … लहान मुलांच्या भांडणाचे कारण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ ऑक्टोबर) : गुंड बोलवून शेजाऱ्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील दिघी भागात घडला आहे. शरद चव्हाण नावाच्या व्यक्तीने लहान मुलांच्या भांडणाचे कारण सांगून भाडोत्री गुंड बोलावत विजयकुमार सुरवसे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील दिघी भागात रविवारी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. गुंडांनी घरातील महिलांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी विजयकुमार सुरवसे यांनी केला आहे. त्याच्यासोबत निखिल वासने या शेजाऱ्यालाही मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Google Ad

गुंडांनी जीवे मारुन टाकू अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्याची तक्रार सुरवसे यांनी दिघी पोलिस स्थानकात केली आहे. दिघीतील औरम वाटिका वसाहतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

आरोपी शरद चव्हाण यांच्या मुलीकडून फिर्यादी विजय सुरवसे यांच्या मुलीला धडक लागली होती. त्यामुळे तिला माफी मागायला लावली. त्यानंतर ती आजारी पडल्याचे कारण देत आरोपीने फिर्यादी यांना घरात घुसून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

79 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!