Google Ad
Editor Choice

महानगरपालिका निवडणूकित चिंचवड मतदार संघ ठरणार ‘किंगमेकर’ … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे ‘मायक्रो प्लॅनिंग’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ऑगस्ट) : भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ सुरू केले आहे.
चिंचवड मतदारसंघातील सांगवी-काळेवाडी मंडलाच्या प्रभाग क्रमांक ३१ च्या समर्थ बूथ अभियानाअंतर्गत शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांची महत्वाची बैठक नवी सांगवीतील मल्हार गार्डन येथे घेण्यात आली.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी चिंचवड च्या महापौर माई ढोरे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका सीमा चौगुले, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, वैशाली जवळकर, प्रभाग क्रं.३१ च्या अध्यक्षा कोमल गौंडाडकर, दर्शना कुंभारकर, अदिती निकम, सुरेश दादा तावरे, भाऊसाहेब जाधव, सूर्यकांत गोफणे, डॉ.व्यंकटेश जोशी, अभिमन्यु गाडेकर, संजय मराठे, भाऊसाहेब शिरोळे, रामदास पोखरकर, रावसाहेब चौगुले, मारुती तरटे, अशोक कवडे, सखाराम रेडेकर, चंद्रकांत बेंडे, सचिन महाडिक, संदीप दरेकर, साई कोंढरे, शुभम फरांदे, श्यामराव धस प्रभाग क्रमांक ३१ चे भाजपचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते.

Google Ad

▶️प्रभाग क्रमांक ३१ भाजपचा बालेकिल्ला

यावेळी बोलताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, प्रभाग क्रमांक ३१ ने आजपर्यंत मला उच्यांकी मतदान देऊन चांगल्या प्रकारे साथ दिली आहे. मला जेवढी मते पडतात त्यापेक्षा जास्त मते नगरसेवकाला मिळायला पाहिजेत. असे नियोजन या पुढील काळात झाले पाहिजे, आणि तुम्ही असे काम कराल ही खात्री मला आहे. आगामी काळात पिंपरी चिंचवड शहराला दाखवून द्या नवी सांगवी हा भाजपचा बालेकिल्ला आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक ३१ हा नियोजन आणि पक्ष कार्यात आदर्श असा प्रभाग दिसून येत आहे, खरचं या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या नियोजनाचा आदर्श इतरांनीही घ्यावा.

▶️’लक्ष्मण भाऊ का एकही अजेंडा, हर बूथ पे भाजप का झेंडा’

यावेळी समर्थ बूथ कसा असावा याचा आदर्श प्रभाग ३१ कडून घ्यावा आणि ‘लक्ष्मण भाऊ का एकही अजेंडा, हर बूथ पे भाजप का झेंडा’ असे नियोजन झाले पाहिजे असे
बाला शुक्ला यांनी सांगितले. तसचे प्रभागातील याद्या रचना याचे नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे केले असल्याने त्यांनी त्याचे श्रेय राजेंद्र राजापुरे यांना देत त्यांचे कौतुकही केले केले. तसेच समर्थ बूथ अभियान म्हणजे काय, पुढील येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांनी आपल्या भागात कशाप्रकारे नियोजन केले पाहिजे याची माहिती शुक्ला यांनी दिली.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कोमल गौंडाडकर यांची प्रभाग क्रमांक ३१ च्या महिला अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!